सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर व जिल्ह्याच्या वतीने, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निम्मित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने प्रतिमा पूजन व प्रतिज्ञा वाचन केले गेले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित अभिवादन करून सामूहिक प्रतिज्ञा वाचन आयोजित केले होते , त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.देशाच्या संविधानाची सुरक्षा आणि संवर्धनासाठी तसेच संविधानाचे महत्व नागरिकांना कळावे या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्हयाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करून  सामूहिक प्रतिज्ञा वाचन घेण्यात आले. घटनेचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन न  करण्यासाठी तसेच सर्व समाजामध्ये बंधुभाव,प्रेम समानत्व टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून धर्मांध शक्तीच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार प्रतिज्ञेच्या माध्यमातून सर्वांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, कुपवाड शहराध्यक्ष तानाजी गडदे, उत्तम कांबळे , महालिंग हेगडे ,वैशाली कळके, डॉ.छाया जाधव, उषाताई गायकवाड,संगीता जाधव,  संध्या आवळे,तेजश्री अवघडे  अर्जुन कांबळे, फिरोज मुल्ला,प्रकाश सूर्यवंशी, सुभाष तोडकर, अभिजित रांजणे,दत्ता पाटील ,विजय जाधव,आदर्श कांबळे,सचिन सगरे,इमॅन्युयल मद्रासी,यशया तालुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top