कोल्हापुरातील शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या ठेवी संकलनाच्या उद्दिष्टांमध्ये, सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकावर.----

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात सन 2022- 2023 साठी दिलेल्या ठेवी संकलनाच्या उद्दिष्टांमध्ये, शिरोळ तालुक्याने बाजी मारली असून, सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नांदणी शाखा ही परत एकदा पहिल्या क्रमांकावर आली असून, ज्यादा शेअर्स उद्दिष्टांमध्ये सलग तीन वर्षे 100% पेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केले आहे. एकंदरीतच पाहता, चालू आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एकूण आर्थिक क्षेत्रातील कामगिरी, ही विशेष उल्लेखनीय दैदीप्यमान झाली असून, शिरोळ तालुक्यातील जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधील अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक, व्यावसायिक धारक यांनी बँकेच्या दैदीप्यमान कामगिरीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले असून ,सर्वजण या कौतुकास पात्र आहेत असे उद्गार जिल्हा बँकेचे संचालक आमदार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले आहेत.
शरोळ तालुक्याला ठेवी संकलनाचे उद्दिष्ट 917 कोटी 54 लाख रुपयांचे दिले होते. 20 मार्च 2023 अखेर 1094 कोटी 10 लाख 08 हजार रुपयांच्या ठेवी जमा करण्यात यश आले. शिरोळ तालुक्याला 150 कोटी रुपयांचे शेअर्स उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु शिरोळ तालुक्याने 175 कोटी 71 लाख रुपयांची रक्कम शेअर्स म्हणून संकलित केली असून, जवळपास 25 लाख 71 हजार रुपये शेअर्स रक्कम, उद्दिष्टांपेक्षा जास्त जमा झाले आहेत. आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात, शिरोळ तालुका कामगिरीच्या बाबतीत हा अग्रेसर राहिला असून ,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संचालकांच्या सहकार्याने वाटचाल चालू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही, एक सहकार क्षेत्रातील शिखर बँक म्हणून प्रसिद्ध असल्याची माहिती राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top