यंदाच्या वर्षीचे मे महिन्यातील कमाल तापमान काही ठिकाणी वाढ होणार, तर काही ठिकाणी तापमान कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 यंदाच्या वर्षीचे मे महिन्यातील कमाल तापमानात काही ठिकाणी वाढ होण्याचा, तर काही ठिकाणी तापमान कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यातील सध्याच्या हवामानातील तापमानाचा पारा हा दिवसे दिवस चढत असताना, आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षीचे मे महिन्यातील तापमान काही ठिकाणी हे जास्त राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमानात वाढ, तर काही ठिकाणी तापमानात उन्हाच्या तीव्रतेची झळ कमी बसणार आहे. मागील काही दिवसात राज्याच्या बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असला, तरी मे महिन्यातही अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्यातील तापमानाच्या स्थितीचा आज अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षीच्या मे महिन्यात, कोकणात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान हे जास्त राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असून ,काही ठिकाणी सरासरीपेक्षा तापमान कमी राहील असा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना उन्हाची झळ कमी बसणार असून, महाराष्ट्रात उष्णतेची लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भातील एक दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा दोन दिवस प्रभाव राहण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top