महाराष्ट्र राज्यात कुठेही १० मिलिमीटर पेक्षा जास्त सलग पाच दिवस पाऊस पडल्यास, नैसर्गिक आपत्ती समजली जाण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय होणार.----

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये, महाराष्ट्रात कोठेही १० मिलीमीटर पेक्षा जास्त सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा आलेला प्रस्ताव, प्रस्तावात काही बदल करून ,पुढील कॅबिनेट मीटिंगमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबद्दलचा अंतिम निर्णय काही दिवसातच जाहीर करण्याची शक्यता आहे. आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्यासाठी फार विस्तृत प्रमाणात सखोल चर्चा झाली असून, हा एक फार मोठा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यापुढे राज्यात सलग पाच दिवस पाऊस १० मिली मीटर पेक्षा जास्त पडल्यास, नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल हा प्रस्ताव, काही तात्विक बदल करून ,मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या पुढील बैठकीत निर्णय निश्चितपणे घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेतला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीची मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.

१.सतत पाच दिवस पडणाऱ्या १० मिलिमीटर पेक्षा जास्त पडणाऱ्या पावसास नैसर्गिक आपत्ती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे.

२.ग्राहकांना स्वस्त दरात वाळू रेती उपलब्ध करून देऊन ,सुधारित रेती धोरणास मान्यता.

३.रेतीचे लिलावबंद.

४.नागपूर मेट्रोरेल टप्पा क्रमांक दोन प्रकल्पास सुधारित मान्यता.

५. ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी, देवनार डम्पिंग मैदानावर कचरा साठवण्यासाठी आरक्षणात फेरबदल.

६. टेलर इन्स्टिट्यूट सागर भारतीय नौदल मुंबई या संस्थेत नाममात्र दराने भाडेपट्ट्याचे नूतनीकरण.

७.प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्मिती करणे.

८.अकृषिक विद्यापीठातील शिक्षक समक्ष पदांना सहाव्या- सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यास मान्यता.

९.नेक एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरता योजना आदी निर्णयांचा समावेश आहे.

एकंदरीत आजच्या झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत,  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय, हा सगळ्यात महत्त्वाचा व दिलासादायक म्हणावा लागेल.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top