कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत ,भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची व काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता, एबीपी -सी वोटर च्या महाओपिनियन पोलचा सर्वे.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

 


 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अत्यंत उत्कंठावर्धक शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष ,काँग्रेस पक्ष व इतर अन्य पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला असून, प्रचार सभेदरम्यान एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोपाने, कर्नाटक विधानसभा निवडणूक गाजत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष यांनी आपापल्या जाहीरनाम्यानुसार प्रचार कार्य जोरात सुरू ठेवले असून, मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी काही घोषणा केल्या जात आहे .नुकताच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी सी वोटर च्या तर्फे महाओपिनियन पोल सर्वे घेतला असून ,या सर्वे मध्ये कर्नाटकात भाजपाला धक्का लागून, काँग्रेस पक्ष बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कर्नाटकात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे सध्या कर्नाटकात, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळ ठोकून असून, त्यांच्या प्रचाराच्या सभा, विविध जिल्ह्यांमध्ये होत आहेत. अशातच कर्नाटकची जनता कोणाला कौल देणार ?कर्नाटकात कुणाचे सरकार बनणार ?या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एबीपी- 'सी' वोटरचा महाओपिनियन पोल घेण्यात आला असून, या सर्वेनुसार कर्नाटकात बहुमताचा आकडा काँग्रेस गाठण्याची शक्यता आहे. बसवराज बोम्मइना धक्का बसण्याची शक्यता ओपिनियन पोल मधून वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विधानसभा निवडणुकींचा निकाल लागणार आहे. तसेच कर्नाटकातील प्रचार सभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत असून, सध्या कर्नाटकातील राजकीय वातावरण फारच तापले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत ,भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात निवडणुका असली तरी, खरी लढत ही भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षामध्येच होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा एबीपी 'सी' वोटरचा महाओपिनियन पोल च्या सर्वेतून एकूण 224 जागांपैकी ,काँग्रेसला 107 ते 119 जागा ,भारतीय जनता पार्टीला 76 ते 86 जागा, जेडीएसला 23 ते 35 जागा व इतर 5 जागा असा अंदाज सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top