भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंखेच्या प्रादुर्भावावर आज, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी महत्त्वाची बैठक बोलावली.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी)



गेल्या काही दिवसापासून भारतात विविध राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रात सुद्धा मुंबईसह कोरोना रोग संख्येचे आकडे वाढत असून, या गोष्टीवर विचार विनिमय करण्यासाठी आज, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्वसाधारण या बैठकीनंतर देशात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे का?, मास्क वापर सक्तीचे करावा लागणार का?, सोशल डिस्टन्स ठराविक ठेवावे लागणार का?, याबाबतीत सूचना व निर्देश राज्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्याबरोबर ऑनलाइन कॉन्फरन्स बैठक होणार असून, दिनांक 10 एप्रिल व 11 एप्रिल 2023 रोजी, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मॉकड्रिल होणार आहे .दरम्यान महाराष्ट्र राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्याही 3987 वर पोहोचली असून, मुंबईमध्ये 1268 ऍक्टिव्ह रुग्ण, तर पुण्यात 738 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत .शिवाय रायगड नागपूर पालघर सातारा आधी जिल्ह्यात सुद्धा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top