कोल्हापुरातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त , शिवराज नाईकवडे यांची प्रशासक अधीक्षकपदी नियुक्ती.--

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 


कोल्हापुरातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान मंदिराचे विश्वस्त मंडळ, अखेर बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय, धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी दिला आहे. गेले काही दिवस वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त करून, प्रशासक अधीक्षकपदी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव राहिलेले शिवराज नाईकवडे यांची, नियुक्ती करण्यात आली आहे. 

आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरोधात ,अनेक भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे, तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी होऊन, अखेर सोमवारी संत बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निकाल देण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांच्या आदेशात प्रशासकीय अधीक्षकपदी शिवराज नाईकवडे यांच्यासहित, निरीक्षक एम.के.नाईक, निरीक्षक श्रीनिवास शेनाॅय यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, धर्मादाय आयुक्तांकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेत ,आदमापुरातील संत बाळूमामा मंदिरात विश्वस्त मंडळातील सदस्यांनी कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मंदिरातील दान रकमेचा, तत्कालीन कार्यालयाच्या अध्यक्षांनी योग्य वापर केला नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान गेले अनेक दिवसापासून सुरू असलेल्या वाद हा, ट्रस्टी सदस्य व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्यामध्ये असून, त्याचे परिणाम धक्काबुक्की करण्यापर्यंत गेले होते. दोन्हीही गटाकडून दावे -प्रतिदावे केले गेले होते. आज अखेर धर्मादाय आयुक्तांच्या निकालाने संत बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त होऊन, प्रशासक अध्यक्षपदी शिवराज नाईकवडे, शिवाय प्रशासकपदी एम. के.नाईक, श्रीनिवास शेनाॅय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top