सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न, राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड यापुढील काळामध्ये अत्यंत मोलाचे कार्य करेल.-- सुदीप दादा चाकोते.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)



सांगलीत आज, सांगली जिल्हा शहर काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे विविधतेनी नटलेल्या भारताची अखंडता टिकून आहे. सर्व भारतीय बांधवाना एकत्र ठेवून भारतीयत्वाची भावना बळकट करण्याचे ऐतिहासिक कामगिरी संविधानाने केली आहे. केंद्रातील मनुवादी सरकारने संविधान विरोधी कारवाईचा धडाका लावला आहे. विषमतेचा वारु सुसाट उधळला आहे. या देशविघातक मनुवादी प्रवृत्तीविरुध्द एकत्रित येऊन लढा उभारण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदिपदादा चाकोते होते.त्यांनी त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेस सेवा दल ही स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणारी एक अनुशासित अशी संघटना आहे यामध्ये राहुलजी गांधी यांनी युवकांच्या साठी यंग ब्रिगेड ही तिसरी विंग सेवा दलामध्ये निर्माण केली आज त्या संघटनेचा मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पुढील पंधरा ते वीस दिवसानंतर सोलापूर येथे पूर्ण महाराष्ट्राचे  प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे त्यामध्ये अजित ढोले यांना महत्त्वाची भूमिका देणार आहोत सदरच्या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस चे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खर्गेजी अखिल भारतीय काँग्रेस सेवादालचे अध्यक्ष लालजी भाई देसाई अखिल भारतीय काँग्रेस सेवादालचे महासचिव लालजी मिश्राजी यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत सांगली येथील प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक करुन पक्ष आणि सेवादल अधिक मजबूत करु या असे आवाहन केले. 


प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. यावेळी श्रीमती जयश्री पाटील यांनी आज जिल्ह्यामध्ये एकीचे बळ बळामुळे मार्केट कमिटी मध्ये यश मिळाले मागच्या महिन्यांमध्ये जे वसंतदादा विचाराचे एकजूट झाली आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी तयार झाली त्यामुळे परत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली ओळखले जाईल सेवा दलाला मोठी परंपरा आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच स्वातंत्र्यानंतरही कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्ष कार्य अत्यंत निस्पृह भावनेने सेवा दलाचे कार्यकर्ते काम करीत असतात त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे त्यांनी सांगितले व डॉ. जितेशभय्या कदम यांनी काँग्रेस पक्षाला सेवा दलाच्या माध्यमातून बळ मिळाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस सेवा दलाचे काम लक्षवेधी ठरले आहे. आता यंग ब्रिगेडचे काम चांगले होत आहे. प्रशिक्षण शिबिरातून पक्ष संघटन कार्य गतीमान होत आहे. काँग्रेस सेवा दलाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते करण्यास आम्ही  तयार आहोत असे प्रतिपादन केले.पृथ्वीराज पुढे म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी साडे तीन हजार किमी.ची भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो भारत जोडो हा ऐतिहासिक संदेश दिला आहे. केंद्रातील सरकार मनुवादी आहे. शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी माणसाच्या हिताविरुद्ध आहे.लोकशाही धोक्यात आली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच देशात लोकशाही व स्वातंत्र्य अबाधित राहील. मार्केट कमिटी निवडणुकीत शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध मतातून आपली ताकद दाखवून दिली आहे. यापुढेही महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळणार आहे. 'दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. नामदेव कस्तूरे यांनी धर्मनिरपेक्ष काँग्रेस विचारधारा व भारतीय संविधान आणि प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी अपयशी भाजपा सरकार व पंतप्रधान या विषयावर मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी, महिला व विद्यार्थी यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.सातारचे वकील प्रतापसिंह देशमुख व नंदकुमार शेळके यांनी काँग्रेस सेवा दल व पक्षाची विचारधारा व कार्यावर मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मौलाली वंटमुरे यांनी केले. आभार पैलवान प्रकाश जगताप यांनी मानले.


यावेळी प्रतापसिंह देशमुख वकील सातारा, बाबा कोतवाल इचलकरंजी, नंदाताई कोलप, प्रतिक्षा काळे,बाबगोंडा पाटील, सुरेश गायकवाड, सुरेश पाटील, विठ्ठलराव काळे, पद्मावती पुजारी, अजित ढोले, पै. प्रकाश जगताप, अशोक रजपूत, देशभूषण पाटील, मौलाली वंटमुरे, चेतन पाटील, श्रीधर बारटक्के, सचिन सावंत, सुनील गुळवणी, अंकलखोपचे महेश व काँग्रेस पक्ष व सेवा दलाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top