छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा मातेची तलवार व वाघनखं, परत करण्याचे आश्वासन ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी दिले.-- राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार.

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा मातेची तलवार व वाघ नखं परत करण्याचे आश्वासन ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी आज मुंबईत, राज्यशासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ,वरील आश्वासन दिले आहे.

दरम्यान पुढील महिन्यात ब्रिटनमधील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर सल्लामसलत करून जगदंब मातेची तलवार व वाघ नखं भारताला परत करण्याचा तपशील ठरवून कळवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जगदंब मातेची तलवार व वाघ नखं परत ब्रिटनमधून येणार या वृत्ताने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यावर्षीच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ब्रिटनकडून ही जगदंब मातेची तलवार व वाघनखं परत मिळत आहेत ही एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. ब्रिटनमधील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत योग्य ती चर्चा व सल्लामसलत करून भारतात जगदंब मातेची तलवार व वाघ नख पाठवण्याची तपशीलवार योजना ठरवली जाईल असे ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी सांगितले आहे.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top