सांगलीतील कवठेमहांकाळ येथे कसबा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार रवींद्र धंगेकर यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न.,--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर हे कवठे महांकाळ दौऱ्यावर आले असताना, त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आजचा कवठेमंकाळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाने घेतलेला नागरी सत्कार समारंभास, कवठेमंकाळ शहरातील विविध स्तरातील मान्यवर, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिकांची उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदारसंघातील नूतन आमदार रवींद्र घंगेकर यांचा कवठेमंकाळ तालुक्यातील दौरा हा प्रथमच असल्याने, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांच्या मध्ये जोश पूर्ण उत्साह दिसत होता.

कवठे महांकाळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार   करताना, तालुकाध्यक्ष संजय (बापू )हजारे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी माणिकराव भोसले, जेष्ठ नेते बाळासाहेब (बापू ) गुरव, जिल्हा प्रतिनिधी धनाजीराव पाटील, जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब शिंदे,सेवादल अध्यक्ष पोपट पाटील ,राजू पोतदार, विलासराव बोराडे, जगन्नाथ भोसले, विलास पाटील, बाजीराव मोरे, नवनाथ मंडले, चैतन्य पाटील , सुनील वाघमारे  व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top