देशभरात आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण, ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद, मोठ्या उत्साहात साजरा.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी ) 


 देशभरात आज मुस्लिमांचा पवित्र सण असलेला ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद, मोठ्या उत्साहाने साजरा झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजान ईद निमित्त, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या. देशभरात संपूर्ण रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर कोठेही सणाला गालबोट लागू नये म्हणून, देशभरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. सर्वसाधारणपणे चंद्राचे दर्शन झाल्यानंतर, दुसरे दिवशी रमजान ईद सर्वत्र साजरी करण्यात येते. राजधानी दिल्लीतील जामा मशीद मध्ये आज ,सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती. रमजान ईद निमित्त आजची नमाज, सार्वत्रिकपणे अदा केली जाते. सध्य परिस्थितीतील देशातील उन्हाचे तापमान लक्षात घेऊन, देशभरातील अनेक भागात सार्वत्रिक नमाज अदा करण्याच्या वेळेत बदल करण्यात आले होते.


 सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाचे तापमान चढत जात असल्याने, सकाळी ठीक 9:00 ते 9:30च्या दरम्यान ,रमजान ईद निमित्त देशभरात विविध ठिकाणी सार्वत्रिक नमाज अदा केली गेली. मुस्लिम समाजातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ,आजची सर्वात मोठी असलेली सार्वत्रिक नमाज अदा केली गेली. देशभरात विविध ठिकाणी हिंदी मुस्लिम बांधवांनी या पवित्र रमजान ईद निमित्त, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षीचा पवित्र सण रमजान ईद देशभरात अति उत्साहाने जल्लोषात साजरा केला गेला.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top