सांगली शहरात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून, सुमारे 10 कोटी रुपयांची विकास कामे सुरू असून, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 

 सांगली शहरात, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग विभागाकडून, १० कोटी रकमेतून  ठिकाणी विकासकामे राबवली जात आहेत. आज वार्ड क्र.७ मध्ये २ कोटी रकमेच्या विविध कामांचे उदघाटन पालकमंत्री ना. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे व काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. एका बाजूला महाराष्ट्र राज्यात म. वि. आ. व भारतीय जनता पक्षाच्या मध्ये राजकीय  चिखलफेक सुरू असताना ,मिरजेत विकास कामाचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील एकत्र कामाचा शुभारंभ करताना दिसतात. हे एक चांगले उदाहरण आहे. राजकारण पलीकडे शहराच्या विकासाच्या बाबतीत राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे.

तसेच सांगलीतील महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाकडून सुरू असलेल्या कामांचे स्वागत असून, सांगली जिल्ह्यात पक्षीय राजकारण चालत नसून ,गटातटाचे राजकारण चालते हे सिद्ध होते आहे. सांगली शहराच्या विकासासाठी राजकारणा पलीकडे जाऊन, राजकीय मतभेद विसरून, सर्वांनी एकत्र येऊन, सांगलीचा विकास केला पाहिजे असे नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top