महाराष्ट्र राज्य माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे तब्बल 120 हून अधिक माजी पोलीस यांची पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी.---

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः 

(मिलिंद पाटील)

 कोल्हापूर मधील तब्बल 120 पोलीस कर्मचारी यांचा वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अलंकार हॉल मध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी भगवानराव मोरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सुरुवातीला पोलीस परेड ग्राउंड वर वयाची 75 पूर्ण केलेल्या सर्व माजी पोलिसांच्या वर फुलांचा वर्षाव करीत अलंकार हॉल येथे आणण्यात आले. त्यानंतर शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भरजरी फेटे बांधून माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्काराने माजी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र होतं. माजी पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिशय अनोख्या आणि भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी माजी पोलिसांचे विविध प्रश्न तसेच संघटनेच्या वतीने राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती माजी पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे यांच्या वतीने देण्यात आले. सर्व आजी-माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या अनोख्या कार्यक्रमात एका कुटुंबाप्रमाणे रंगून गेले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top