कोल्हापूर जिल्ह्यात दि.22 मे 2023 वार सोमवारपासून, दुचाकीवाहनस्वारांना हेल्मेट सक्ती-- कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील.

0

 


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

 कोल्हापूर जिल्ह्यात येत्या दि.22 मे 2023 वार सोमवार पासून ,दुचाकीवाहनस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असल्याची माहिती, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीवाहनस्वारांना हेल्मेट सक्तीच्या बाबतीत ,पहिल्या टप्प्यात सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय ,कॉलेज यांचा समावेश करण्यात आलेला असून ,प्रथम टप्यात जनजागृतीसाठी, आठ दिवस कारवाई न करता सांगितले जाईल. त्यानंतर मात्र कोणाचाही मुलहीजा न ठेवता, हेल्मेट नसलेल्या दुचाकीवाहन स्वारांना 1000 रुपये दंडाची शिक्षा करण्यात येईल. 

कोल्हापूर शहरातील संस्थेत काम करणाऱ्या दुचाकीवाहन स्वार असणाऱ्या व्यक्तींना, त्यांचे मालकांच्या बरोबर प्रत्येकी 1000 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. सुरुवातीस 8 दिवस जनजागृतीसाठी सूचना देण्यात येतील. त्यानंतर मात्र कोल्हापुरातील हेल्मेट शिवाय फिरणाऱ्या दुचाकीवाहनस्वारांना 1000 रुपये दंड वसूल करण्याच्या कामाला गती येईल. कोल्हापुरात गेले कित्येक वर्षातील दुचाकीवाहन धारकांच्या अपघातातील मृत्यूचे  प्रमाण लक्षात घेऊन, सदर हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. शिवाय दुचाकीवाहनधारकांच्या हिताचा सदरहू निर्णय असल्याचे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top