सांगलीतील शंभर फुटी रोड वरील भोबे गटारीतून पावसाळ्यापूर्वी 22 टन कचरा काढला.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून, मान्सून पूर्व नालेसफाई गतीने सुरू आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार, महापालिका क्षेत्रात मक्तेदाराकडून, युद्धपातळीवर नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामावर उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांचे नियंत्रण असणार आहे. सांगलीतील मोठी समजली जाणारी भोबे गटार स्वच्छ करण्यात येत असून, यातून साधारण 22 टन कचरा बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आला आहे.

   सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आठ दिवसापासून नालेसफाई सुरू आहे. याबाबतचा आढावा शनिवारी आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत घेऊन नालेसफाईसाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अंतर्गत पालक अधिकाऱ्यांनी आपाआपल्या भागामध्ये नालेसफाई कामावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्याचे आहे. मान्सूनपूर्वी आणि  वेळेमध्ये नालेसफाई पूर्ण व्हावी,  पूर्ण क्षमतेने नालेसफाई व्हावी यावर या पालक अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याबाबतच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या होत्या. यानुसार महापालिका क्षेत्रात मोठे नाले कचरामुक्त आणि गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शंभर फुटी रोडवरील भोबे गटार स्वच्छतेचे काम दोन दिवसापासून हाती घेण्यात आले आहे. या संपूर्ण गटारी मधून आत्तापर्यंत 22 टन कचरा बाहेर काढण्यात आला असून, यामध्ये सर्वाधिक कचरा हा प्लास्टिक बाटल्यांचा निदर्शनास आला आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बाटल्या ह्या भव्य गटारीमध्ये टाकल्या जात असल्यामुळे, वारंवार भोबे गटार तुंबण्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या भोबे गटारीच्या स्वच्छतेला सुरुवात केल्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे , वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर , स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर यांनी पाहणी करत, मक्तेदाराला संपूर्ण गटारीतील गाळ काढण्या बाबतच्या सूचना केल्या.

    दरम्यान बोभे गटारीमध्ये बाहेर काढण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये सर्वाधिक कचरा हा प्लास्टिक बाटल्या व अन्य प्लास्टिक साहित्य याचा दिसून आला आहे. पर्यावरणाला घातक असणारे प्लास्टिकचा हा कचरा या गटारीमध्ये टाकला जात असल्याने ही गटार वारंवार तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक कचरा हा गटारीमध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडी मध्ये टाकावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top