अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे, 26 मे 2023 वार शुक्रवार रोजी, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार ,भव्य दिव्य पत्रकार संमेलन सोहळा 2023.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

अहमदनगर जिल्ह्यातील, शिर्डीत २६ मे २०२३ रोजी भव्य दिव्य असा पत्रकार संमेलन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे तसेच शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर उपस्थित राहणार आहेत.

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन संघटनेतर्फे या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अहमदनगर तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतून दिग्गज पत्रकारांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्या दरम्यान पत्रकारांना पत्रकारिता करताना भेडसावणाऱ्या समस्या, आर्थिक सक्षमीकरण अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा दिनांक २६ मे २०२३ रोजी सायंकाळी ०५:३० वाजल्यापासून सुरु होणार असून "हॉटेल ९ कॉइन, श्री. साईबाबा मंदिर शेजारी, लक्ष्मीबाई शिंदे मार्ग, कौसल्या नगर, शिर्डी" या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या विविध संघटनांनी देखील निसंकोचपणे आवर्जून या सोहळ्यात सहभागी व्हावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष संदिप कसालकर यांनी केली आहे. या प्रसंगी Kya News (Know Your Area) या नॅशनल App चे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार असल्याचे Kya News App चे संस्थापक देवेश गुप्ता यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top