कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील मौजे उदगाव गावाजवळ, 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा ,राज्याच्या मंत्रिमंडळात बैठकीतील निर्णय--

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे मौजे उदगाव गावाजवळ, 365 खाटांचे प्रादेशिक  मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय, नुकताच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आला .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळ मौजे उदगाव येथील, 365 घाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणीच्या खर्चासाठी, सुमारे 146 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, सदरहू निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल. दरम्यान रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या धर्तीवर, जयसिंगपूर येथील उदगाव गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या, प्रादेशिक मनोरुग्णालयातील पदांची भरती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे .

 आजच्या झालेल्या मंत्रिमंडळातील झालेला निर्णय.

रस्त्यांच्या गुणवत्ता पूर्ण देखभाल- दुरुस्तीसाठी, पायाभूत सुविधासाठी ,महाराष्ट्र शासनाकडून विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सदरहू महामंडळाचे भाग भांडवल 100 कोटी रुपये राहणार असून ,51% चा हिस्सा हा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. यासाठी तरतुद केलेल्या शासनहिश्याचा निधी, टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे .सदरहू रस्त्यांच्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विकास महामंडळात मार्फत, जवळपास राज्यातील 3 लाख किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्यांपैकी 1 लाख किलोमीटरच्या प्रमुख राज्य मार्गच्या देखभाल दुरुस्ती साठी, कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top