कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या, आधुनिकीकरणासह सुधारित योजनेच्या 70 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीला, प्रशासकीय मान्यता.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मध्ये ,जयसिंगपूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी, आधुनिकीकरणासह पाण्याच्या टाक्या उभारणे ,मुख्य पाईप लाईन बदलणे, नवीन फिल्टर हाऊस आधुनिकीकरणासह सुधारणा करणे आदी कामासाठी 69 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी, आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती, माजी राज्यमंत्री व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. जयसिंगपूर शहरासाठी 15 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारणे, शाहूनगर परिसरा नवीन 2 लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारणे, काका ऑइल मिल परिसराला 5 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारणे, खामकर मळा परिसराला 5 लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा करणारी टाकी उभारणे, शिवाय 16.05 एम. एल .डी. क्षमतेचे, आधुनिक पाणी शुद्धीकरण प्रकल्पासह फिल्टर हाऊस उभारणे, जयसिंगपूर शहरात 70 किलोमीटर लांबीची शहरांतर्गत नवीन पाईपलाईन टाकणे इत्यादी कामांचा समावेश असल्याचे माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले आहे. 

सन 2055 पर्यंतच्या जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लक्षात घेऊन, अत्याधुनिक पाणीपुरवठा प्रकल्प जयसिंगपूरला मंजूर व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या सर्व सहकाऱ्यांची मागणी होती. आपण स्वतः ही योजना शासन दरबारी मंजूर व्हावी यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न करीत होतो. याला आज अखेर यश येऊन, जयसिंगपूर शहराला सुधारित अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे, माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top