सांगली जिल्ह्यात ,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत, महानिर्मितीचे 7.56 मेगावाॅट क्षमतेचे, सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 महाराष्ट्र राज्य सरकारने, राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, तसेच शेतीसाठी दिवसा, शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी, जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत, 7.56 मेगावाॅटचे 2 सौर ऊर्जा प्रकल्प ,5 मे 2023 रोजी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे. यातील पहिला प्रकल्प हा नागेवाडी येथे उभारला असून, त्याची क्षमता 4.2 मेगावाॅट आहे. नागेवाडीतील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे, नदीकाठच्या 4 गावांना म्हणजेच नागेवाडी ,अंजनी, वडगाव, लोकरेवाडी या गावातील 1200 ते 1300 कृषी वीज ग्राहकांना उपयुक्त ठरणार आहे. सदर प्रकल्प नागेवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे उभारण्यात आलेला आहे.


अंजनी येथील ३३/११ केवी अंजनी- नागेवाडी उपकेंद्राला सदरहू प्रकल्प जोडण्यात आला असून, शासकीय 10 हेक्टर पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या प्रकल्प उभारणीचा खर्च 15 कोटी रुपये झाला आहे. महानिर्मिती, मेसर्स इ इ एस एल (विकासक), मेसर्स टाटा सब वेंडर आहेत. दुसरा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील, जत तालुक्यात, वालेखिंडी येथे उभारण्यात आला असून, त्याची क्षमता 3.36 मेगावाॅट असून, त्याचा फायदा बेबनूर, शिंदेवाडी, नवलेवाडी ,वालेखिंडी येथील सुमारे 1000 कृषी वीज ग्राहकांना होणार आहे .हा प्रकल्प शासकीय 8 हेक्टर जमिनीवर उभारण्यात आला असून , त्याचा खर्च 12 कोटी रुपये आला आहे. महावितरण कंपनीच्या वालेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडण्यात आला असून, या 2 सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी 15 व्यक्तींना रोजगार मिळण्यात येणार असून, वीजदर हा रुपये 3 .30 पैसे आकारला जाणार आहे .येत्या काही महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी (सांगली), कुंभोज (कोल्हापूर), सोनगाव (सातारा) येथील पण प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ,अनुक्रमे 2 मेगावाॅट, 4.4 मेगावाॅट, 4.2 मेगावाॅट क्षमतेचे आहेत. सध्याच्या घडीला महानिर्मिती कडून, एकूण 367.42 मेगावाॅट सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशानुसार, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ  पी अंनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच, 100 मेगावाॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी, विकासकांना पत्र देण्यात आले असून ,चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2023 -2024 करता, सुमारे 1000 मेगावात सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेच्या प्रकल्पांच्या लक्ष्यावर व प्रकल्प कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top