सांगलीत आज जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिर संपन्न, भारतीय संविधान हा काँग्रेस पक्षाचा प्राण असून, संविधानाची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन.- पृथ्वीराज पाटील.य

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे विविधतेनी नटलेल्या भारताची अखंडता टिकून आहे. सर्व भारतीय बांधवाना एकत्र ठेवून भारतीयत्वाची भावना बळकट करण्याची ऐतिहासिक कामगिरी संविधानाने केली आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगलीतील ३२ जयंती उत्सव मंडळात समक्ष भेटीत संविधान प्रती देऊन अभिवादन केले आहे. केंद्रातील मनुवादी सरकारने संविधान विरोधी कारवाईचा धडाका लावला आहे. विषमतेचा वारु सुसाट उधळला आहे. या देशविघातक मनुवादी प्रवृत्तीविरुध्द एकत्रित येऊन लढा उभारण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदिपदादा चाकोते होते.त्यांनी प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक करुन पक्ष आणि सेवादल अधिक मजबूत करु या असे आवाहन केले. प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. यावेळी श्रीमती जयश्री पाटील व डॉ. जितेशभय्या कदम यांनी काँग्रेस पक्षाला सेवा दलाच्या माध्यमातून बळ मिळाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस सेवा दलाचे काम लक्षवेधी ठरले आहे. आता यंग ब्रिगेडचे काम चांगले होत आहे. प्रशिक्षण शिबिरातून पक्ष संघटन कार्य गतीमान होत आहे. असे प्रतिपादन केले.


पृथ्वीराज पुढे म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी साडे तीन हजार कि.मी.ची भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो भारत जोडो हा ऐतिहासिक संदेश दिला आहे. केंद्रातील सरकार मनुवादी आहे. शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी माणसाच्या हिताविरुद्ध आहे.लोकशाही धोक्यात आली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच देशात लोकशाही व स्वातंत्र्य अबाधित राहील. मार्केट कमिटी निवडणुकीत शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध मतातून आपली ताकद दाखवून दिली आहे. यापुढेही महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळणार आहे. 'दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. नामदेव कस्तूरे यांनी धर्मनिरपेक्ष काँग्रेस विचारधारा व भारतीय संविधान आणि प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी अपयशी भाजपा सरकार व पंतप्रधान या विषयावर मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी, महिला व विद्यार्थी यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.सातारचे वकील प्रतापसिंह देशमुख व नंदकुमार शेळके यांनी काँग्रेस सेवा दल व पक्षाची विचारधारा व कार्यावर मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मौलाली वंटमुरे यांनी केले. आभार अजित ढोले यांनी मानले.

यावेळी प्रतापसिंह देशमुख वकील सातारा, बाबा कोतवाल इचलकरंजी, नंदाताई कोलप, प्रतिक्षा काळे,बाबगोंडा पाटील, सुरेश गायकवाड, सुरेश पाटील, विठ्ठलराव काळे, पद्मावती पुजारी, अजित ढोले, पै. प्रकाश जगताप, अशोक रजपूत, देशभूषण पाटील, मौलाली वंटमुरे, चेतन पाटील, श्रीधर बारटक्के, सचिन सावंत, सुनील गुळवणी, अंकलखोपचे महेश व काँग्रेस पक्ष व सेवा दलाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top