सांगलीतील तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आर. आर पाटील गटाने, आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करून, सत्ता हस्तगत केली.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 सांगलीतील तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आर. आर. पाटील यांच्या गटाने, पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करून, सत्ता हस्तगत केली आहे. आमदार सुमनताई आर. आर. पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली,राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवार विजयी झाले असून, खासदार संजय काका पाटील व काँग्रेसचे महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विरोधी पॅनलला, फक्त 4 जागांवर समाधानी रहावयास भाग पाडले आहे.आजच्या निकालानंतर, राष्ट्रवादी युवा नेते रोहित पाटील, सुरेश पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या पुतळ्याला नमन करून उत्साहवर्धक जल्लोष साजरा केला. 

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणात होते. एकूण 1866 मतदारान हक्क बजावून, संध्याकाळपर्यंत 97% मतदान पूर्ण झाले होते .सायंकाळी ठीक 5:45 च्या सुमारास मतमोजणी सहा टेबलवर चालू होऊन ,पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुरेश मारुती बेले हे 42 मते घेऊन हमाल तोलायदार गटामध्ये विजयी झाले. व्यापारी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम लक्ष्मण माळी 145 मते घेऊन, तर भाजपचे कुमार रामचंद्र शेटे हे 96 मते घेऊन निवडून आले. सर्वसाधारण गटातून सुनील भानुदास पाटील 423 मते, अवधूत सुभाष शिंदे 399 मते, अनुसूचित जाती जमाती गटातून राजाराम गुंडा पाखरे 398 मते, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून धनाजी नारायण पाटील 399 मते घेऊन निवडून आले. सोसायटी सर्वसाधारण गटातून संग्राम आबासो पाटील ४७६ मते रवींद्र वसंत पाटील 472 मते, दत्तात्रय भिमराव थोरबोले 461 मते, रामचंद्र सत्तू जाधव 460 मते, विठ्ठल रामचंद्र पवार 460 मते, अनिल विश्वासराव पाटील 460 मते, बाजार समिती बचाव पॅनलचे महादेव सदाशिव पाटील 442 मते घेऊन निवडून आले. सोसायटी गट सर्वसाधारण महिला गटातून रेखा रवींद्र पाटील 464 व विजया शंकर पाटील 480 मते घेऊन निवडून आल्या. सोसायटी गट इतर मागास प्रवर्गामधून अंकुश सदाशिव माळी 496 मते, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून मुकुंद सुबराव ठोंबरे 485 मते घेऊन निवडून आले. दरम्यान दुसऱ्यांदा फेर मतमोजणी अखेर, रेखा रवींद्र पाटील या 1 मतांनी विजयी झाल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top