महाराष्ट्र राज्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी, मराठा उद्योजक घडवण्यासाठी, सामंजस्य करार.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


महाराष्ट्र राज्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी, मराठा उद्योजक घडवण्याच्या उद्देशाने, सामंजस्य करार करण्यात आला आहे. शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या अंतर्गत, राज्यात जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडवण्याचा उद्देशाने ,बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात मध्ये, एक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. हा करार बँक ऑफ इंडियाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात, पुणे विभागीय सह व्यवस्थापक राधाकांत सह अन्य पदाधिकारी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाला. 

वरील करार हा पुणे, कोल्हापूर ,सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर तसेच संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात आला असून ,राज्यात अधिकाधिक मराठा उद्योजकांना लाभ होण्याच्या दृष्टीने, हा करार करण्यात आला आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. या महामंडळाच्या लाभार्थ्यांना या करारा अंतर्गत सी जी टी एम एस इ व सीजीएफएमयू या दोन क्रेडिट गॅरंटी देण्यात येणार आहे. या क्रेडिट गॅरंटी च्या आधारे, जे मराठा तरुण कर्ज मागणी करतील ,त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. राज्यात मराठा उद्योजक जास्तीत जास्त घडवण्यासाठी व तयार होण्यासाठी महाराष्ट्र शासन व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, हे कायम प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top