सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेनुसार ,एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी ,या उपक्रमांतर्गत बैठक संपन्न व लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब  यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या,जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे. 


या अनुषंगाने आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  "एक तास राष्ट्रवादी साठी " बैठक घेण्यात आली.बैठकीच्या सुरवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती  शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

          यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने 'राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेब-एक राजकीय विद्यापीठ' या अनुषंगाने आदरणीय शरद पवार साहेबांच्या एकूण राजकीय,समाजिक,क्रीडा,शैक्षणिक अशा विविधांगी कार्यावर चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर बैठकीत आदरणीय पवार साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने पवार साहेबांचा अभिनंदन व आभाराचा  ठराव करण्यात आला.

यावेळी उत्तम कांबळे , असिफ बावा ,समीर कुपवाडे ,अनिता पांगम ,वैशाली कळके , छाया जाधव ,  आयुब बारगिर ,उमर गवंडी ,डॉ शुभम जाधव  महालिंग हेगडे ,अर्जुन कांबळे , संगीता जाधव , सुरेखा सातपुते ,रुपाली कारंडे , विनायक हेगडे , संदीप दळवी , रामभाऊ पाटील, संजय सरवदे , प्रकाश सुर्यवंशी ,परवेज मुलाणी,  कुमार वायदंडे ,युवराज नाईकवाडे ,अरुण चव्हाण ,विजय जाधव ,मुन्ना शेख,  राजू पवार , राजू मुळके ,नितीन माने , आप्पासो ढोले , रुपेंद्र जावळे , फिरोज मुल्ला , अमीन शेख , जुबेर मुजावर ,अजित पाटील , संतोष कांबळे ,अभिजित रांजणे,  अमित पाटील, सुमित कुंभोजकर , आदर्श कांबळे आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top