सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी व जयसिंगपूर येथील शाळा काॅलेजच्या उन्हाळ्यातील सुट्टीच्या सहलीसाठी, रेल्वे तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध असून, त्याविषयी तपशीलवार माहिती.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)


सांगली रेल्वे स्टेशन पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख स्टेशन असल्याने सर्व गाड्यांमध्ये सांगली स्टेशन पासून भरपूर आरक्षित तिकीट बुक करता येतात.

रोज ३००० पेक्षा जास्त तिकीटे सांगली रेल्वे स्टेशनवरुन बुक करता येतात. ईतर कुठल्याही स्टेशनवर जाण्याची गरज नाही.

सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या ५० पेक्षा जास्त गाड्यांचे आरक्षण कोणत्याही स्टेशनवरुन किंवा आनलाईन www.irctc.co.in या वेबसाईट वरुन करता येते. एका सहलीसाठी आवश्यकता अनुसार जेवढी तिकिटे पाहिजे असतील तेवढी तिकिटे सांगली स्टेशनवरून मिळतील. जास्तीत जास्त एका गाडीची २०० तिकिटे देखील सांगली स्टेशन पासून बुक करता येईल - गाडीतील सिट उप्लब्धते अनुसार. तिकीट बुक करताना प्रवास सुरुवातचे स्टेशन सांगली व बोर्डींग स्टेशन सांगली लिहावे. सांगली स्टेशनपासूनचे तिकिट वेटींग लिस्ट असल्यास सुरुवातचे ईतर उपलब्ध स्टेशन टाका, व बोर्डींग स्टेशन सांगली लिहा. सांगली स्टेशनवरुन गाडी पकडा.


बुकिंग कसे करावे याची माहीती---

 सहलीच्या तारखेपूर्वी ४ महीने अगोदर सांगली स्टेशनवरून बुकींग करावे. जेवढी तिकिटे पाहिजे आहेत तेवढी तिकिटे हमखास मिळतील.

जर ७२ तिकिटे बुक करायची असल्यास शाळा काॅलेज येथील ५-६ लोकांनी बुकिंग साठी सांगली स्टेशन किंवा ईतर मोठ्या स्टेशनवर जावे. कमी तिकिटे असल्यास कमी लोकांनी जावे.

  www.irctc.co.in या वेबसाईट वरुन आनलाईन बुकींग केल्यास स्टेशनवर जाण्याची गरज नाही. एका फाॅर्मवर ६ विद्यार्थीसाठी जाणे व परतीचे तिकीट घेता येते. ६ लोकांना प्रत्येकी ६ विद्यार्थीसाठी तिकीट बुक करता येईल. म्हणजे एकूण ७२ विद्यार्थ्यांचे तिकिट एका वेळी बुक करता येईल. ७२ पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास परत रांगेत उभे राहून गरज प्रमाणे आणखी फार्म भरा व तिकीट बुक करा.

जर सांगली स्टेशन पासूनचे तिकीट बुकिंग करण्यास रेल्वे कर्मचार्याने नकार दिला किंवा बोर्डींग स्टेशन सांगली लिहिलेले फार्म स्विकारण्यास रेल्वे कर्मचाऱ्याने नकार दिल्यास त्वरित स्टेशन मास्तर कार्यालयात लेखी तक्रार करावी लेखी तक्रार करुन देखील सांगली स्टेशन पासूनचे तिकीट बुकिंग करण्यास नकार दिले किंवा इतर स्टेशनपासूनचेच तिकीट बुक करा. असे रेल्वे कर्मचार्याने सांगितल्यास सांगली जिल्हा नागरीक जाग्रृती मंचचा संपर्क साधावा.सांगली रेल्वे स्टेशन पासूनचे तिकीट बुक करणे ही रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी असून तिकीट बुक करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तक्रार केल्यास कडक कारवाई होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top