पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग लगत, कात्रज नवीन बोगदा ते नवले पुला दरम्यान, नवीन वेग नियंत्रणात्मक मर्यादा निश्चित.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

 पुणे- बंगळूर महामार्ग लगत कात्रज नवीन बोगदा ते नवले पुला दरम्यान अपघातांची मालिका लक्षात घेऊन, जड वाहनांना आता, नवीन नियंत्रणात्मक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदर कात्रज नवीन बोगदा ते नवले पुला दरम्यान, वेग मर्यादा नियमांचं पालन न केल्यास ,प्रशासनाच्या कठोर कारवाईस चालकांना तोंड द्यावे लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील नवले पूला जवळ अपघातांची मालिका व हॉटस्पॉट ठरलेल्या, नवले पुलादरम्यान प्रशासनाकडून, योग्य ते उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान प्रशासनाने निश्चित केलेल्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान, जडवाहनांसाठी वेग मर्यादा प्रतितास 60 किलोमीटर वरून प्रति तास 40 किलोमीटर इतकी आणण्यात आलेली आहे. जवळपास प्रति तास 20 किलोमीटर वेग मर्यादा कमी करण्यात आलेली आहे. 

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दररोज सरासरी 300 वाहनांवर, कारवाई करण्यात येत असून, काही हॉटेल चालक व व्यावसायिक सेवा असलेले व्यक्तींकडून ,डिव्हायडरचे नियम तोडत असल्याचे दिसत असल्यावरून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचवण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा, उपाययोजनांचा आढावा घेऊन, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी, प्रति तास 20 किलोमीटरची वेग मर्यादा घटवून, 40 किलोमीटर प्रतितास वेग मर्यादा निश्चित केली आहे .दरम्यान खेड शिवापुर येथे, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली वरून, वाहतूक नियमांच्या जनजागृती विषयी सूचना देण्यात येत आहेत. याबरोबरच कात्रज नवीन बोगदा ते नवले तुला दरम्यान वेग मर्यादा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांच्यावर, चालकांच्यावर, कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top