यंदाच्या वर्षीचे पाऊसमान कमी असल्यामुळे, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश.--- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)


 देशात आणि महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षीचा पाऊस कमी असलेने, पावसाचे सर्व पाणी जमिनीत जिरवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यानी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी, जलसंधारण अधिकाऱ्यांची व राज्यातील वनविभाग अधिकाऱ्यांशी बोलत असताना, वरील आदेश देत होते.

 महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धोरण ,गाळमुक्त शिवार आदी  योजनांना प्रभावीपणे कार्यान्वित करून ,सर्व कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरू होण्यास थोडाच अवधी असल्याने ,धरणातील, नदीतील, नाल्यातील गाळ लवकरात लवकर काढण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, पाण्याच्या साठवणीसाठी क्षमता वाढणाऱ्या जागांची निवड करावी तसेच लोकअभियान राबवून ,लोक चळवळ उभा करणेत यावी. दरम्यान राज्यातून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटनांची मदत ,सल्ले घेऊन ,आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top