सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्ता संघर्षावर, सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देणार, देशाचे व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षावर, सर्वोच्च न्यायालयात आज, सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देणार असून, देशाचे व संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांच्या सदस्यत्वाच्या वैद्यतेबाबत, घटनापीठ निकाल सुनावणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे-,बंडामुळे निर्माण झालेला घटनात्मक पेच, न्यायालयात पोहोचला होता. गुरुवारी सकाळी 11:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ, निकाल सुनावण्याची शक्यता असून, राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. राज्यातील जनतेला निकाल टीव्हीवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पुढील राजकारणाला दिशा देणारा निकाल ठरणार असून ,राजकीय भवितव्य निकालावर अवलंबून आहे. 


शिवसेनेतील अंतर्गत कलाहामुळे झालेल्या बंडानंतर, 36 बंडखोर आमदारांनी 23 जून 2022 रोजी, विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथराव शिंदे यांची निवड केली होती. 24 जून 2022 रोजी शिवसेनेने शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करणेबाबतची मागणी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांचे कडे केली होती. विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना अपात्रतेविषयी नोटीसा पाठवल्या होत्या ,परंतु या सर्व 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने केंद्र सरकार, शिवसेना, महाराष्ट्र पोलीस, विधानसभा उपाध्यक्षांसह सर्वांना नोटीस पाठवून, सुनावणी चालू केली होती. सर्वोच्च न्यायालयात ,शिंदे शिवसेना गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे ,नीरज कौल आदीनी युक्तीवाद केला होता ,तर ठाकरे शिवसेना गटाकडून प्रसिद्ध कायदे तज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आदी दिग्गजानी बाजू मांडली होती, तसेच राज्याचे राज्यपाल यांचेकडून सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली होती .सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठासमोर झालेल्या सुनावणीनंतर, 16 मार्च 2023 रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला होता .संपूर्ण देशाचे व महाराष्ट्राचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठाकडून देण्यात येणाऱ्या निकालाकडे लागले असून, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान विविध घटनात्मक मुद्द्यांशी चर्चा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठात सरन्यायाधीश व्ही .वाय. चंद्रचूड यांचे सह न्यायमूर्ती एम. आर. शहा ,न्यायमूर्ती हिमा कोहली ,न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती पी. एस .नरसिंम्हा आदी 5 न्यायमूर्तींचा समावेश आहे. एकंदरीतच आजचा निकाल हा, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा ठरेल यात तीळ मात्र शंका नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top