महाराष्ट्र राज्यातील बेपत्ता झालेल्या मुलींच्या शोधासाठी, विशेष तपास पथकांची स्थापना करावी.-- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी) 


 महाराष्ट्र राज्यात, विशेष म्हणजे बेपत्ता मुलींची संख्या वाढत असून, बेपत्ता झालेल्या मुलींच्या शोधासाठी, राज्य सरकारने विशेष लक्ष घालून, विशेष तपास पथकं स्थापन करण्याची विनंती ,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे. 

दरम्यान जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये अनुक्रमे 1600 ,1800, 2200 इतकी संख्या बेपत्ता झालेल्या मुलींची आहे. देशात गेली 2-3 वर्षे सर्वाधिक मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण, महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच महिला कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशासनानं ,तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे .एकंदरीत राज्यातील बेपत्ता मुलींचे प्रमाण वाढत असून, या पाठीमागची कारणमीमांसासुद्धा करणे महत्त्वाचे बनले आहे. राज्यातील विशेष तपास पथकांच्या सहाय्याने, बेपत्ता झालेल्या मुलींचा तत्काळ शोध घेऊन, याबाबतीत सखोल तपास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top