सांगलीतील माईघाटावर, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, चला जाणू या नदीला, या उपक्रमांतर्गत कलश पूजन. नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखाने, संस्थांच्यावर प्रथमतः सीईटीपी एचटीपी प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न करावेत-- नागरिक जागृती मंच नेते सतीश साखळकर.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)


 सांगलीत माई घाटावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने, चला जाणूया  या उपक्रमाअंतर्गत कलश पूजन कार्यक्रम पार पडला असून कलश पूजन जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले . त्याचे स्वागत आहे शासनातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबवल्या जाणाऱ्या, "चला जाणुया नदीला" या अभियानामध्ये, जिल्ह्यातील कृष्णा, तिळगंगा, अग्रणी, महांकाली, येरळा आणि माणगंगा या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


या अभियानाच्या माध्यमातून, नद्यांना पुनर्जीवन मिळणार आहे. त्यामुळे नाश पावत चाललेली नदी जिवंत राहिली पाहिजे, तसेच नदीच्या आरोग्याबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण झाली पाहिजे. यादृष्टीने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.


मात्र पालकमंत्री मा नाम. सुरेश खाडे यांना माहिती आहे कि सांगली जिल्हा हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात 28 गावे, 3 नगरपालिका,1 महानगरपालिका यांचे सगळे सांडपाणी मिसळत आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे कामाचा शुभारंभ केला असता तर, अभिमान वाटला असता. तरी  प्रत्येक गावाचं सांडपाणी वर प्रक्रिया करणारे सीईटीपी एचटीपी प्लांट उभारून, नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न कराउउउञवेत .त्याच पद्धतीने 13 साखर कारखाने, वेगवेगळे उद्योग दूध संस्था यांचे सीईटीपी प्लांट तात्काळ सुरू केल्याशिवाय, त्यांचे कारखाने सुरू करण्यात येऊ नयेत व प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे असे आवाहन नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top