तुरंबे गावचे सुपुत्र, व एस. बी. युवा फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष सागर रविंद्र भावके यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना "युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स"ने सन्मानित करण्यात आले.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः 

(मिलिंद पाटील)

मुंबई ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, तुरंबे गावचे सुपुत्र व एस बी युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर रविंद्र भावके यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल "युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डस" ने फिल्म ऍक्टर मिलिंद दास्ताने (मुळशी पॅटर्न, तुझ्यात जीव रंगला. फेम) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ बी एन खरात होते. युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विशिष्ट लोकांना पुरस्कार प्रदान करत आली आहे. संस्थेच्या वतीने ठाणे येथे आर्ट लिटरेचर कल्चर कॉन्फरन्स अँड अवॉर्ड 2023 अंतर्गत आशियाई प्रतिभावंतांच्या एकत्रित करण्याचा शोध घेऊन प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे त्या व्यक्तीची व समाजाची ओळख होऊन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात यावर्षीचा पुरस्कार सागर रवींद्र भावके यांना देऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे कोल्हापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना युनिव्हर्सल टॅलेंट ऑफ रेकॉर्डस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बी. एन. खरात, ए. आर.आखडे, डी. वाय. एस. पी. शिवाजीराव जमदाडे, अद्वैत फाउंडेशन चे संचालक मदन ढेकळे, महाराष्ट्र पोलिस संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top