मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेस पक्ष नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आज निर्णय घेणार! सध्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पारडे जड.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर, महाराष्ट्राचे काँग्रेसने नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासह असलेल्या समितीने, काल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना, मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत, कर्नाटक विधायक सदस्यांचा कल, अहवालाच्या रूपाने सादर केला आहे . शिवाय आज महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य ,कर्नाटक मधील सध्याची परिस्थिती बाबतीत, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना, आपले मनोगत व कर्नाटक विधायक आमदारांच्या भावना कळवणार आहेत. 

दरम्यान कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के.शिवकुमार यांचे भाऊ सुरेश हे सध्या दिल्लीत असून, त्यांनी काल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन, आपले भाऊ शिवकुमार यांनाच मुख्यमंत्री करावे असा आग्रह धरला आहे. दरम्यान वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचेसमोर, अन्य पर्याय देखील ठेवण्याच्या विचारात पक्षश्रेष्ठी असून, नंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे समजते. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी, कर्नाटकाच्या बाबतीत तुम्हीच मला विजय मिळवून द्या असे सांगून, माझे वर कर्नाटक विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी टाकली होती. त्यानुसार मी ती पार पाडली असून, आता थोडे सौजन्य दाखवून, माझ्या नावाचा विचार मुख्यमंत्री पदाच्याबाबतीत, प्राधान्याने होऊन दखल घ्यावी असे भावनिक आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना केले आहे. एकंदरीत कर्नाटक आमदारांचा कौल माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे असल्याचे दिसल्यावरून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के.शिवकुमार यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर यापूर्वी त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीत, कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, ही एक त्यांच्या जमेची बाजू असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जरी केले असले ,तरी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. एकंदरीत आजच्या घडीला कर्नाटक विधायक आमदारांचा कल लक्षात घेऊन व सध्याच्या राजकारणातील कंगोरे लक्षात घेऊन, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे !.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top