सांगलीतील नीट परीक्षेदरम्यान झालेल्या प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करा - राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव यांची मागणी.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

    

नुकत्याच सांगली येथे झालेल्या नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या  बाबतीत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे.नीट परीक्षा दरम्यान झालेला प्रकार दुर्दैवी असून लोकशाही मूल्य व्यक्ती स्वातंत्र्य व घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करणारा आहे. आजपर्यंत देशात प्राथमिक शाळा परीक्षा ती अगदी यूपीएससी सारख्या परीक्षे दरम्यानसुद्धा असा दुर्दैवी प्रकार घडलेला नव्हता. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक मनोधैर्य  खचले असून घडलेला प्रकार क्षमा करण्यासारखा नसून या जबाबदार असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा  दाखल करण्यात यावा. सदर प्रकारात योग्य ती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळातील कोणत्याच परीक्षा होऊ न देण्याचा  निर्धार आम्ही केला आहे.  ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्यावरती आपल्या स्तरातून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव यांनी निवेदना द्वारे मा. जिल्हाधिकारी ,मा. जिल्हा पोलीसप्रमुख व मा. शिक्षण अधिकारी यांना  केलेली आहे.

    यावेळी जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव ,अलका माने, कमलाताई पाटील ,वैशाली कळके , गीतांजली इरकर ,मृदुला कुलकर्णी , सायली गोंदील ,छाया जाधव ,राधिका हारगे , विदुला कावरे ,  तेजश्री बोंडे  , सुरेखा सातपुते संगीता जाधव आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top