राजभवनातील भव्य समारंभात, देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार गौरव समारंभ ,राज्यपाल रमेश बैस हस्ते संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)


 विश्व संवाद केंद्र मुंबई च्या वतीने देण्यात येणारे , देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार मुंबईत आज राजभवनामध्ये ,राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. देश एकीकडे प्रगतीपथावर जात असताना, विघातक नॅरेटिव्हज बनवले जात आहे ,अशा प्रचाराना बळी न पडता, योग्य माहितीच्या आधारे, माध्यमाद्वारे मुकाबला करून राष्ट्रहित जपणे ,सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचे असल्याचे व यामध्ये माध्यमांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले .आज राजभवनात देवर्षी नाराज पत्रकारिता पुरस्कार 22वे राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्याचा समारंभ, मुंबईतील राजभवनावर संपन्न झाला .त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय रमेश बैस हे बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार भूषवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये, रत्नागिरीचे जेष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, दैनिक सकाळचे प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, वैभव पुरंद,रे निलेश खरे, जयंती वागधरे ,अनय जोगळेकर, अंशुल पांडे ,समाज माध्यमिक क्षेत्रातील निनाद पाटील आणि ऋषिकेश मगर यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top