मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन, राज्य सरकारकडून रद्द.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी) 

 महाराष्ट्र राज्याच्या सरकारने, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द केले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने नुकतेच राज्यपालांच्या परवानगीने, यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाचे दिवस म्हणजे  02डिसेंबर 2021 पासून सेवानिवृत्तीच्या दिवस अखेर म्हणजे 30 जून 2022 पर्यंतचा कालावधी, हा सेवेत हजर होते असे गृहीत धरण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार त्यांना आता, सेवानिवृत्ती व इतर लाभ मिळवण्यात कोणतीही अडचण असणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधातील सेवा नियमानुसार दाखल करण्यात आलेले सर्व आरोप पत्रेही सरकारने मागे घेत असल्याचे व संपूर्ण प्रकरण बंद करत असल्याचे दुसऱ्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आता, निवृत्तीनंतरचे सर्व फायदे, लाभ मिळवण्यात कोणत्याही अडचणी असणार नाहीत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात ,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन करण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे ,खंडणीचे, गैरव्यवहाराचे, तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आरोप झाले होते.

 तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोपाबाबत, चांदीवाल आयोगही नेमला होता. अखिल भारतीय सेवा नियम 1969 च्या नियम 8 अंतर्गत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरुद्धची विभागीय चौकशी बंद करून ,त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय सेवा नियम 1958 च्या तरतुदीनुसार ,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा झालेला कालावधी हा, कर्तव्य कालावधी म्हणून सेवेसाठी ग्राहय धरण्यात आला आहे असे आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top