युरोपातील सर्वात मोठी असलेली व जगातील चौथी असलेली जर्मनीची अर्थव्यवस्था संकटात.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी व जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेली ,जर्मनीची अर्थव्यवस्था ही संकटात सापडली आहे. गेले काही महिन्यापासून जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडली असून, आर्थिक मंदीच्या अवस्थेत सापडली आहे. सध्याचे अस्तित्वातील जर्मनीचे जीडीपी चे आकडे बघून ,त्यावर जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचे चित्र प्रतिबिंबित झालेले असून, त्यावर जवळजवळ अर्थव्यवस्था संकटात असल्यावर च्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जर्मनीमध्ये सध्या महागाईमुळे तेथील नागरिक सध्या फार मोठ्या संकटांना तोंड देत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे ,जर्मनीत आर्थिक मंदीची सुरुवात झाल्याची चर्चा असून ,त्याचे पडसाद जागतिक लेवलला उमटत आहेत. सध्याच्या परिस्थितीत नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जर्मनीचा जीडीपी रेट 0.3 टक्के इतका घसरला असून ,2022 मध्ये जर्मनीचा जीडीपी रेट 0.5 टक्के पर्यंत घसरला होता. सलग दोन जीडीपीच्या रेटमध्ये घसरण बघितली असता, अर्थव्यवस्थेमध्ये नकारात्मकता दिसून येत असून, मंदी जाणवत असल्याचे जागतिक तज्ञांचे मत आहे. मुख्यत्वे जर्मनीची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर, होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून असून, जर्मनीमध्ये ऊर्जेच्या सध्याच्या किमती, या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. शिवाय  जर्मनी मधले नैसर्गिक वायू, एलएनजी हे रशियाकडून पुरवठा होत असल्यामुळे, त्यांच्या किमती गॅस पेक्षा अधिक महाग झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होण्याची वेळ ,जर्मनी मधल्या कंपन्यांवर आली आहे. दरम्यान सद्य परिस्थितीत जर्मनीमधील महागाईचा दर एप्रिलमध्ये 7.6% इतका उच्चाकी बघायला मिळाला असून ,जर्मनीमधील असणाऱ्या कामगार युनियन कडूनही वेतन वाढीच्या मागणीमुळे, जर्मनीमधील कंपन्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका, सर्व युरोपियन राष्ट्रांना बसला असून, त्यात आता जर्मनी सारखा देश सापडला आहे.

 दरम्यान जर्मनी मध्ये आर्थिक मंदीची लाट येणे म्हणजे अनेक युरोपीय राष्ट्रांसाठी व जागतिक राष्ट्रांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. वेळीच सर्व राष्ट्रांनी पुढील पावले ओळखून, अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणारे उपाय, योजनेचे जरुरी जागतिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top