सांगली जिल्ह्यातील विटा गावात, विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, अँटी करप्शनच्या जाळ्यात.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर अँटी करप्शन अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. दोन लाखांची लाच स्विकारताना त्यांना रंगाहाथ पकडले आहे. केवळ तीन महिन्यापूर्वी दहा मार्च रोजी त्यांची विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी बदली झाली होती. 

विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना लाच लचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज मंगळवारी (दि. १६) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान तीन महिन्यापूर्वी १० मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. आल्यापासूनच त्यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या.

सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खानापूर रस्त्यावरील विश्रामगृहावर विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांची लाच लुचपत विभागाच्या मार्फत कसून चौकशी सुरू आहे, यात अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. विनायक औंधकर हे कायम वादाच्या भोवऱ्यात असायचे. अँटी करप्शनने छापा टाकल्यानंतर काही नागरिकांनी विटा नगरपालिकेचे समोर फटाक्याची आतीशबाजी केली.

विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top