कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञ पर्व स्मृती शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 कोल्हापुरात लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ संपन्न झाला असून, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचनालयाच्या वतीने सुमारे 120 हून अधिक लोक कलावंतांनी, कलेद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आज मानवंदना दिली. आज झालेल्या सायंकाळच्या सत्रात, शाहू मिलच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे हस्ते झाले. राज्यातील येणाऱ्या नवीन पिढीकडून राजश्री शाहू महाराजांचे कार्य आचरणात येण्यासाठी ,लोकराजा राजाची छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष समारंभ, साजरे करण्याचे उद्दिष्ट होते. लोकराजा राजश्री शाहू महाराजांचे कार्य विचार आचरणात आणणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी ठीक 6:00 वाजता 100 सेकंदाची वाहिलेली आदरांजली, ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद गौरवास्पद आदर्शवत ठरली आहे. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्षाच्या महोत्सवाला, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी वर्ग ,इतर सर्व संस्था ,संघटना, स्वयंसेवी संस्थानांच्या कडून झालेली मदत अविस्मरणीय आहे. आज कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून या सर्वांचे आभार व्यक्त करून, धन्यवाद देण्यात आले. समाजासमाजात कोणत्याही जातीभेदाला थारा न  देणे, ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरत असून ,महात्मा फुले, लोकराजा राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचारावर राज्य तसेच देश अधिक गतिमानतेने वाटचाल करील यात शंका नाही असे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे. दि. 6 मे 2023 पासून 14 मे 2023 पर्यंत 8 दिवसाच्या कालावधीत कोल्हापूरकरांना लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या शताब्दी परवा निमित्त, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. तब्बल 8 दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये ,लहान मुलांसाठी नृत्य ,चित्रकला ,रेखाटन ,कॅलिग्राफी, शिल्पकला, पेपर क्राफ्ट ,मातीकाम, पाॅटरी रंगकाम, मातीशिल्प आदी कलेचे उपक्रम राबविण्यात आले. याबरोबरच छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यछटा तसेच अतिशय दर्जेदार चित्रपटही जिल्हा प्रशासनामार्फत दाखवण्यात आले .या लोकराजा राजश्री शाहू महाराज कृतज्ञता पर्वामध्ये, कोल्हापूरकर रसिकांच्या साठी खाद्य जत्रा, आंबा महोत्सव, शस्त्र दालन, बुक स्टॉल, कापड विभाग, महिला बचत गटाच्या विविध उत्पादित झालेल्या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल आदींचा समावेश होता. गेले 8 दिवस चालू असलेला राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता सोहळा, हा कोल्हापूरकर नगरवासी यांचे सांस्कृतिक लक्षवेधी आनंदमय पर्वणी ठरून गेला. लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचे कार्य युवा पिढीला जवळून पाहता येण्याचा अनुभव, या सोहळ्यामुळे मिळाला.

गौरव गुणीजनांचा : -

कृतज्ञता पर्व प्रारंभ दि ६ ते १४ मे समारोप कार्यक्रमा प्रसंगी श्री. छत्रपती शाहू मिल येथे महत्वपूर्ण योगदान

देणाऱ्या विविध संस्था : -

१)अर्थ मूवर्स असोसिएशन. २)कॅमल. ३)चैम्बर ऑफ कॉमर्स. ४) शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. ५) मॅन्युफॅक्चरर्स असो ऑफ कागल हातकणंगले. ६) कोल्हापूर इंजिनिअर्स असोशिएशन. ७)गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन. ८) पॉवरलूम असोसिएशन. ९) कोल्हापूर आय टी असोसिएशन. १०)सराफ संघ. ११) निर्मिती ग्राफिक्स . १२) बी व्ही जी (ग्रुप). १३)समाज कल्याण विभाग. १४)सार्वजनिक बांधकाम विभाग. १५)कोल्हापूर महापानगरपालिका स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन विभाग. १६)CPR HOSPITAL TEAM. १७)जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान (DRDA).  १८) राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान (NULM). १९)महिला आर्थिक महामंडळ. २०) जिल्हा खादी व ग्रामोद्योग विभाग. २१)जिल्हा माहिती कार्यालय. २२) महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ. २३) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग. २४) महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर. २५) शासकीय ग्रंथालय. २६) शिवाजी विद्यापीठ. २७) पोलीस विभाग. २८) जिल्हा उद्योग केंद्र. २९) कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग. ३०) जिल्हा क्रीडा विभाग. ३१) इवेन्ट मॅनेजमेंट व प्लॅनर्स असोसिएशन (EMPA). ३२) कोल्हापूर आर्ट फौन्डेशन व लहान मुलांचे सर्व प्रशिक्षण वर्ग आयोजन केलेले सर्व प्रशिक्षक. ३३) श्री बापट सर. ३४) शिवगर्जना प्राचीन युध्दकला प्रशिक्षण संस्था. ३५) इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा या संस्थांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

  याप्रसंगी कृतज्ञता पर्व संयोजन समिती सदस्य: -

उदय गायकवाड, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर,प्राचार्य अजेय दळवी, प्रा .डॉ.महादेव नरके, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे , डॉ . कविता गगराणी , सुखदेव गिरी,प्रसन्न मालेकर वसीम सरकवास,संदेश जोशी यांच्यासह अनेक शाहू व कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top