सांगलीतील सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे, काँग्रेस पक्ष व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

 सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे, काँग्रेस पक्ष व सेवा दल च्या वतीने, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना पुण्यतिथी निमित्त,अभिवादन करण्यात आले.प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यशवंत आप्पे यांचे हस्ते माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, व बाकीचे उपस्थितानी फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी स्वागत प्रस्ताव अरुण पळसुले यांनी केला. आभार विश्वासराव यादव यांनी मांडले. यावेळी बोलताना यशवंतराव आप्पे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबरोबर, स्वर्गीय वसंतराव दादांच्या मुळे काम करण्याचे संधी मिळाली.दादा खासदार व अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस असताना, स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी दिल्ली येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्या मेळाव्याची जबाबदारी स्वर्गीय वसंतराव दादांच्या यांचेकडे दिली होती व त्यांच्या सोबतीला राजीव गांधी यांना मेळावा यशस्वी करण्याचे सांगितले होते. 1984 साली इंदिराजी गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी दादा पुणे येथे होते. रात्री 10:30 वाजता पुणे येथून मुंबईला व मुंबई ते दिल्ली स्वतंत्र विमानाने दिल्ली येथे पोहोचले व त्यावेळी दादा यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले. यावेळी प्रणव मुखर्जी व नरसिंहराव हे इच्छुक होते. परंतु दादांनी देशातील काँग्रेस पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना एकत्रित करून, स्वर्गीय राजवजी गांधी यांचे नाव एक मुखाने निवड केली .रात्री 11:30 वाजता स्वर्गीय राजीवजी गांधी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली व दादा यांनी शीख समुदायाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात परत आले. 1984 लोकसभा व 1985 महाराष्ट्रातील प्रचारा वेळी दादा समवेत प्रचार करीत होते. 

आज पक्षाच्या एकोपामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एकत्रित एकोपाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केले तर महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता येऊ शकते .सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाने काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात सातत्य ठेवून, काँग्रेस बळकट करण्याचे काम करीत आहे असे सांगितले. यावेळी अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनी, स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देऊन, काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवून, कर्नाटक प्रमाणे देशांमध्ये काँग्रेसचे व काँग्रेस समविचारी पक्षाची सत्ता आणण्यासाठी, आपण सर्वांनी एक दलाने काम करूया असे सांगितले यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव सचिन चव्हाण ,विजयराव नवले, मौलाली वंटमोरे, रविंद्र वळवडे, ओबीसी सेलचे अशोक सिंग राजपूत, अमित बस्तावडे ,कांचन खंदारे, शिवाजी सावंत ,विठ्ठलराव काळे, बाबगोंडा पाटील, विक्रम सिंह पाटील, कणेरी मठाचे सरपंच अनिल नाईक ,अशोकराव पाटील, शिवाजी माळी, मुफित कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top