कोल्हापुरातील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारणीचे काम कोणत्याही परिस्थितीत, येत्या वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आदेश.---

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी) 

 कोल्हापुरातील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर  उभारण्याचे काम, कोणत्याही परिस्थितीत वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आदेश, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत आज झालेल्या सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीच्या दरम्यान, कोल्हापुरातील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या बाबतीत प्रस्तावावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या बाबतीत ,वरील आदेश दिले आहेत. कोल्हापूर शहरात राजाराम तलावात जवळ हे संकुल उभारण्यात येणार असून, त्यात बहुउद्देशीय 2000 आसन क्षमता असलेलं प्रेक्षक गृह, सभागृह बैठक कक्ष, आर्ट गॅलरी, खुले प्रेक्षक गृह उभारण्याचा यात समावेश असेल .कोल्हापूर शहरातील राजाराम तलावात संगीतकारंजे, लाईट अँड साऊंड शो इत्यादी गोष्टींची उभारणी करण्यात येऊन, कोल्हापूरकर शहरवासीयांना एक नवे आकर्षणात्मक आनंदासाठी ठिकाण उपलब्ध झालेले असेल. 

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निधीतून, सदर कोल्हापुरातील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर तसेच राजाराम तलावातील संगीतकारंजे लाईट अँड साऊंड शो इत्यादी कामे करण्यात येतील.कोल्हापूरकर औङ यांच्या दृष्टीने, गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरची उभारणीचं काम, येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिल्यामुळे, फार मोठा दिलासा मिळाला आहे .कोल्हापूर शहराच्या सदरहू आधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमुळे वैभवात भर पडणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top