राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा ,देशातील राजकीय क्षेत्रात खळबळ.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याने, देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वयाच्या व तब्येतीच्या कारणांचा विचार करून, निवृत्ती जाहीर केली असून ,देशातील राजकीय क्षेत्रात एक प्रकारे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले आहे की, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बदलणार नाहीत. त्याबरोबरच विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, नवीन अध्यक्ष पक्षाने दिला तर काय अडचण आहे? आपण सर्वांनी मिळून, नवीन अध्यक्षांना पाठिंबा देऊया. दरम्यान यापूर्वीच्या  दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवणार असल्याचे सांगितले असून, त्याची सुरुवात स्वतःपासूनच करणार असल्याचे संकेत, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिले होते. शिवाय सर्वांनी या गोष्टीसाठी तयार राहिले पाहिजे असे सांगितले होते. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना, सर्वाधिक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे टेन्शन आले असून,पवार साहेब आपला निर्णय, नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बदलतील असे वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने, राजकीय क्षेत्रात आज फार मोठ्या चर्चेला उधाण आले असून, सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध तर्कवितर्क केले जात आहेत. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे, आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय बदलतील का? याकडे देशाचे व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top