सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या रोमहर्षक निवडणुकीत ,सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी विजयी, तर आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी) 

 सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी यांनी, झालेल्या रोमहर्षक  निवडणुकीतून विजय मिळवला आहे. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे. आजच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी व उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाल्यामुळे, आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजीराव पाटील यांनी, आपल्या कूटनीतींचा वापर करीत, गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये, 10 विरुद्ध 8 मताने, सभापतीपदाची माळ शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी यांच्या गळ्यात घातली. वास्तविक पाहता दोन्ही गटाच्या 9-9 अशा समान जागा निवडून आल्या असताना सुद्धा, शिंदे गटाने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापतीपदी राजमान होण्याचा मान मिळवल्यामुळे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. 
आजच्या झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादीच्या युतीकडून, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख तर उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी दादासाहेब उबाले यांनी अर्ज दाखल केला होता. शिवसेना शिंदे गटाकडून सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी संतोष पुजारी व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी पक्ष या युतीस 9 जागा तर शिवसेना व  काँग्रेस अशा युतीस 9  जागा मिळाल्या होत्या .आजच्या झालेल्या रोमहर्षक लढतीत, शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी हे सभापतीपदी 10 विरुद्ध 8 मतांनी विजयी होऊन, काँग्रेसचे राहुल गायकवाड हे सुद्धा उपसभापतीपदी  10 विरुद्ध 8 मतांनी विजय झाले आहेत .आटपाडी कृषी उत्पन्न बाजार निवडणुकीत सभापतीपदाच्या व उपसभापती पदाच्या निवडणुकीत, अत्यंत चुरस निर्माण झाली होती. एकंदरीतच आजच्या झालेल्या घडामोडीत शिंदे गटाचे संतोष पुजारी हे सभापतीपदी रोमहर्षक लढतीतून विजयी झाले आहेत व काँग्रेसचे राहुल गायकवाड हे उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top