विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या चौकटी राहूनच, आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाची दारे आम्हाला खुली.-- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 

 विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कायद्याच्या चौकटीतच बसवून, आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला परत सर्वोच्च न्यायालयाची दारे खुली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांच्यावर जे सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत, त्यामुळे तत्कालीन राज्यपालांचे जे झाले, त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील तोंड दाखवायला जागा राहणार नाही .मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकार बैठकीत, त्यांनी याबाबतीत आपले विचार मांडले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मी शिवसेना जोपासली, जपली, प्राणापलीकडे प्रेम केले. अशा शिवसेनेला गद्दारांच्या माध्यमातून ,भाजपने जो दावणीला बांधण्याचा घाट घातला असून, तो आता सर्वोच्च न्यायालयात उघडा झालेला आहे. 

रम्यान मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे .सध्याचे विधानसभा अध्यक्ष हे आधी शिवसेनेत, नंतर राष्ट्रवादीत, त्यानंतर भाजपमध्ये असून, त्यांना पक्षांतराचे चांगलेच ज्ञान असून, कायद्याच्या चौकटीतून पक्षांतर कसे करायचे ? हे माहीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याची लढाई ही शिवसेनेची नसून, देशात जो काही नंगानाच चालला आहे, त्यामुळे देशाची व त्याबरोबरच आपल्या सर्वांची बदनामी होत आहे, हे योग्य नसून ती थांबवण्याचे आवाहन प्रंतप्रधान यांना केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top