सांगलीतील काँग्रेस भवन विटा येथे, विटा व खानापूर तालुक्याच्या काँग्रेस सेवा दलाची बैठक संपन्न.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी ) 


काँग्रेस भवन विटा येथे, खानापूर तालुका व विटा शहर काँग्रेस सेवा दलाची बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अजित ढोले यांनी, दिनांक 7 मे रोजी सांगली येथे होणाऱ्या, डॉ. नासू हर्डीकर जयंती निमित्त कार्यक्रम संदर्भात, तसेच 9 मे रोजी इस्लामपूर येथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या खास उपस्थितीत व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ओबीसी मेळाव्या संदर्भात, खानापूर तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते येण्यासाठी, या बैठकीत आवाहन केले. खानापूर तालुक्याला काँग्रेस ची परंपरा आहे. या खानापूर तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते यांनी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत रुचवण्याचं काम केले आहे .तशाच पद्धतीने यापुढील काळामध्ये खानापूर काँग्रेस सेवादल अत्यंत चांगले काम करून ,काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवेल असे सांगितले. प्रारंभी विटा शहर चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले .आभार खानापूर तालुक्याचे अध्यक्ष मच्छिंद्र महापुरे यांनी मांडले. यावेळी आटपाडीचे गजानन सुतार यांनी सेवादल अध्यक्ष अजित ढोले यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना गजानन सुतार यांनी, त्यामध्ये काँग्रेसला मानणारे बहुसंख्येने कार्यकर्ते आहेत .परंतु त्यांना एकत्रित करून ,काँग्रेस पक्ष बळकट केले पाहिजे. यापुढील काळामध्ये अजित ढोले यांनी प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन, काँग्रेस सेवा दल पर्यायने काँग्रेसला बळकट करावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळीसेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले,तालुक्याचे ज्येष्ठ नेते अशोकभाऊ साळुंखे, निरिक्षक गजानन सुतार,

 सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष मचिंद्र महापुरे,शहर अध्यक्ष बाळासाहेब पाटील,मुनीर शिकलगार,बाबसाहेब फाळके, किसन गायकवाड,रमेश कांबळे,विशाल भिंगारदेवे,पाकीजा शिकलगार,सदाशिव कळकुटे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top