सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सेवा दलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त, अभिवादन कार्यक्रम संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी) सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने, सेवा दलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हर्डीकर यांची जयंती निमित्त, काँग्रेस भवन सांगली येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समडोळी येथील सचिन ढोले यांच्या नेतृत्वाखालील, कराटे संघ गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट काम करून, वीर ढोले ,श्रेया मगदूम, पल्लवी चव्हाण, भूमी देवर्षी ,अश्रुता कोळी, मनस्वी कोळी ,ऋषभ कांबळे ,मनोज कोळी, धनश्री सरवदे, श्रेया मस्कर ,प्रमिना कोळी, रोनक पाटील, वर्धमान मुंडे  अशा 18 मुला- मुलींचे मलेशिया स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. 


प्रारंभी  डॉ. ना. सु. हर्डीकर यांच्या प्रतिमेस नगरसेवक मयूर पाटील व ॲड. किरण राजपूत, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आले. यावेळी बोलताना मयूर पाटील यांनी सेवा दलाचे संस्थापक हार्डीकर यांनी अनुशासित अशी संघटना स्थापन करून ,काँग्रेसला बळकट करण्याचे काम केले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचा आहे. त्यांनी राज्यसभेवर दोनदा निवड झाली. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने ही गौरविण्यात आले होते. यावेळी अजित ढोले यांनी बोलताना स्थापन केलेल्या हिंदुस्तान सेवा दलाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यांनी 1925 ला यातून हिंदुत्ववादी संघटना बाजूला गेल्यावर, त्याचे नाव काँग्रेससेवादल ठेवण्यात आले. 1931 साली महात्मा गांधी यांनी अधिवेशनामध्ये,  ध्वज वाहक म्हणून सन्मान दिला गेला, त्या वेळेपासून आजपर्यंत, काँग्रेस सेवा दल काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे अंग म्हणून कार्यरत आहे. पक्षाच्या अधिवेशनामध्ये सेवामय रीतीने अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे. तसेच भूकंप, पूर परिस्थिती, सुनामी, वादळ यामुळे झालेल्या फडझडीमध्ये, जनतेच्या मदतीसाठी सेवा दल सतत कार्यरत राहिले आहे. देश अखंडतेसाठी, देशाच्या संविधानासाठी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी, पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी ,सेवा दलाचे काम उत्कृष्टपणे चालू आहे .


यावेळी स्वागत अरुण पळसुले यांनी केले. शेवटी आभार मौलाली वंटमोरे यांनी मांडले. यावेळी सहकार सेलचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट भाऊसाहेब पवार, ॲड. शिवाजी साळुंखे, विक्रम पाटील, सर्जेराव मोहिते, शितल मद्वाने, प्रविण गोंधळे. प्रदेश संघटक पैगंबर शेख, ओबीसी चे अशोक सिंग राजपूत, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुभाष तात्या खोत, नगरसेवक शिकलगार, यंग ब्रिगेडचे चेतन पाटील, महेश शिंदे ,विश्वास यादव, नामदेव पठाडे ,सुरेश गायकवाड, रामसिंग परदेशी ,कांचन खंदारे ,शमशाद नायकोडी ,सुरज हुपरे ,राजू पाटील भिलवडी, शिवाजी सावंत, हनुमंत यादव ,शैलेंद्र पिराळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top