अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले यांची निवड व सांगलीच्या इस्लामपूर मधील संदीप पाटील यांची, कार्यकारणी सदस्यपदी निवड.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले यांची निवड झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे संदीप पाटील यांची कार्यकारणी सदस्य अखिल भारतीय नाट्य परिषदेची नुकतीच निवडणूक चुरशीची झाली होती. त्यात रंगभूमी नाटक समूह पॅनलचा दणदणीत विजय झाला होता.  

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर, कार्यकारणीची निवड प्रक्रियेची पूर्तता मुंबईमध्ये आज पार पडली असून, 60 नियमक सदस्य मंडळाने आजच्या झालेल्या निवडणुकीत मतदान केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ,मध्यवर्ती मुंबई कार्यकारणीवर स्थान मिळवण्यात, रंगकर्मी पॅनलचे इस्लामपूरचे संदीप पाटील यांच्या रूपाने यशस्वी झाले आहेत. 

आजच्या झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीनंतर, नूतन अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले ,उपाध्यक्ष (प्रशासन विभाग )नरेश गडेकर, उपाध्यक्ष (उपक्रम विभाग) भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे ,कोषाध्यक्ष सतीश लोटके ,सहकार्यवाह समीर इंदुलकर, दिलीप घोडके ,सुनील ढगे, कार्यकारणी सदस्य विजय चौगुले ,देसाई चंद्रकांत ,संदीप पाटील गिरीश महाजन, सविता मालपेकर, संजय रहाटे ,दीपक रेगे ,सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजय साळुंखे ,दीपा क्षीरसागर आदींचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top