सांगलीतील विष्णू अण्णा पाटील फळ मार्केट मधील असुविधा दूर करू.-- सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, व सांगली बाजार समितीचे नूतन संचालक आनंदराव नलवडे.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीतील विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमधील असुविधा दूर करण्याची ग्वाही सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि सांगली बाजार समितीचे नूतन संचालक आनंदराव नलावडे यांनी आज येथे दिली.दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे फळ मार्केटमध्ये ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणची पाहणी आज श्री. पाटील व श्री. नलावडे यांनी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्यासमोर फळ मार्केटमधील असुविधांचा पाढा वाचला. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.


कांदा गोदामावरील पत्रे खराब झाले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी गोदामात आले, तसेच खिडक्यातूनही पाणी आत आले, त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. जिथे भाजी व्यापार होतो, त्या ठिकाणीही पत्र्याचे शेड नाही, त्यामुळेही अडचण निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी नव्या शेडची निर्मिती करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यासंदर्भात टेंडर काढले होते, पण त्याची कार्यवाही झाली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.मार्केट कमिटीचे गेट लहान आहे, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. वाहनांना आत येणे आणि जाणे सुलभ व्हावे यासाठी पाठीमागच्या बाजूलासुद्धा एक गेट करावे. तेथे जागा आरक्षित करण्यात आलेली आहे, ती खरेदी करून नवीन गेट करता येऊ शकते, ते करावे, असेही व्यापाऱ्यांनी सुचवले.

अनेक इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पुरेशा टॉयलेटची व्यवस्था आणि त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यासही व्यापाऱ्यांनी सांगितले. काही व्यापाऱ्यांनी आपला व्यापार दुसरीकडे हलवण्याच्या भावना बोलून दाखवल्या, परंतु या सुविधा करून दिल्या जातील, असे पाटील व नलावडे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या या सर्व प्रश्नांबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, आणि कार्यवाही केली जाईल असे श्री. पाटील आणि नलावडे यांनी त्यांना सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top