महालक्ष्मी चेंबर्स मधील एक हॉटेल आणि तीन यात्री निवास विनापरवाना असल्याचे उघड.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः 

(मिलिंद पाटील.)

 आजच्या भागात आम्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'श्री महालक्ष्मी चेंबर्स' मधील अवैध तथा कोणतीही रीतसर परवानगी न घेता सुरू असलेल्या हॉटेल्स लॉजिंग आणि यात्री निवास यांचा पोलखोल करणार आहोत. काही दिवसांपूर्वी जनप्रतिसाद न्यूजने 'महालक्ष्मी चेंबर्स' मधील खड्डा वजा-डबक्यातून दूषित पाणी या चेंबर्स मधील काही हॉटेल, लॉजिंग आणि यात्री निवास व्यावसायिक वापरून ग्राहकांच्या आरोग्याची कसा खेळ मांडला होता हे दाखवले होते. या प्रकरणात आम्ही रीतसर माहिती घेतली असता अजून मोठे खुलासे होत आहेत. या भागातील महानगरपालिकेचे कर्मचारी असलेले पाणी मीटर रीडर यांनी सांगितल्याप्रमाणे यातील एक हॉटेल आणि तीन यात्री निवास कोणतीही परवानगी न घेता गेल्या दोन वर्षांपासून आणि अधिक काळाहून सुरू आहेत. यातील हॉटेल राजेश यांच्याकडे तर याबाबतचा कसलाही परवाना नसताना तब्बल 18 खोल्यांचं हॉटेल सुरू आहे. तर तीन यात्री निवास यांना अजून महानगरपालिकेच्या परवाना विभागाने कसलीच परवानगी घेतलेल्या दिली नसताना, कोणाच्या आशीर्वादाने इतक्या मध्यवर्ती ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. याचा शोध घेतला पाहिजे. 


आमच्या माहितीनुसार महानगरपालिकेचे काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन आणि आर्थिक तडजोडीच्या जोरावर हे व्यवसाय सुरू असल्याचे समजते. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे सर्वसामान्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना कायद्याचा धाक दाखवून कारवाई करतात, तशी कारवाई महालक्ष्मी चेंबर्स मधील व्यवसायावर का होत नाही. याचा शोध स्वतः महापालिका आयुक्तांनी घ्यावा, नाहीतर समाजाचा चौथा स्तंभ म्हणून लवकरच आम्ही रीतसर कायदेशीर मार्गाने हे विनापरवाना व्यवसाय कसे सुरु आहेत. आणि त्यामागील पालिकेतील किंवा बाहेरील कोण सूत्रधार आहेत हे पुढील भागात पुराव्यानिशी दाखवून देऊ. या विनापरवाना व्यवसायांमधून रोजची हजारोची माया जमा होते. नियमानुसार कर आणि परवानगी असणे महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या हिताचे असताना, झारीतले कोण 'शुक्राचार्य' आहेत जे की चिरीमिरी घेऊन आणि आर्थिक सेटिंग लावून महानगरपालिकेचे हजारो रुपये उत्पन्न बुडवत आहेत. आणि स्वतः मात्र आपली उन्नती साधत आहेत यांचा शोध घेऊन स्वतः आयुक्तांनी घेऊन कडक कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा समाजाचा चौथा खांब म्हणून आम्ही आमची जबाबदारी लवकरच बिनचुक पार पाडणार आहोत.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top