जपान मधील हिरोशिमा येथे, G-7 शिखर परिषदेसाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज G-7 शिखर परिषदेसाठी, जपानमधल्या हिरोशिमा येथे दाखल झाले आहेत. त्याबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर राहणार असून, आज जपान मधील हिरोशिमा येथे त्यांचे जल्लोषात उत्साहवर्धक स्वागत करण्यात आले. जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे G-7 परिषदेला उपस्थित राहण्यासाठी, हिरोशिमा येथे आले आहेत. G-7 शिखर परिषदेमध्ये ,अनेक प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांची ,प्रमुख विषयावर प्राधान्य कमाक्रमानुसार चर्चा होईल असे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नवी दिल्ली येथे सांगितले आहे. G-7 परिषदेमध्ये आण्विक निशस्त्रीकरण, आर्थिक ताकद ,सुरक्षा, प्रादेशिक समस्या, हवामान , ऊर्जा, अन्न ,आरोग्य आणि विकास आदी बाबींवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा डाजिटायझेशनसकट विचार केला जाणार आहे.

दरम्यान 20 मे 2023 रोजी दोन सत्रे व 21 मे 2023 रोजी तिसरे सत्र होणार आहे. G-7 च्या शिखर परिषदेत पहिल्या सत्रात अन्न, आरोग्य, विकास, स्त्री पुरुष समानता आदी विषयांवर चर्चेचा जोर असेल ,तर दुसऱ्या सत्रात मुख्य विषय हवामान, ऊर्जा ,पर्यावरण तसेच तिसऱ्या सत्रात शांतता, स्थिरता, समृद्ध जगाकडे वाटचाल या विषयांवर चर्चा अधोरेखित होईल. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे G-7 शिखर परिषदेमध्ये अनेक राष्ट्रांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा व सल्लामसलत  करणार आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top