पुणे शहरांमध्ये, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेन,MPL लिग स्पर्धा येत्या 15 जून पासून सुरू होणार असून, आज स्पर्धेच्या लोगोचे अनावरण समारंभ संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

पुणे शहरांमध्ये, IPL प्रमाणेच आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने MPL लीग स्पर्धा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव ,ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील १०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुरूषांचे ६ संघ व महिलांचे ३ संघ सहभागी होणार आहेत.IPL प्रमाणे या स्पर्धेमध्ये ही खेळाडूंना सुविधा उपलब्ध असणार आहेत.खेळाडूंना मोठी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठी T 20 स्पर्धा म्हणून MPL स्पर्धा पार पडणार आहेत , काल मुंबई येथे या स्पर्धेच्या लोगो चे अनावरण झाले.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा.आ. रोहित पवार , सचिव मा.शुभेंद्र भंडारकर ,खजिनदार मा. संजयजी बजाज व सहसचिव मा. बोबडे यांच्या सह राज्य व जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top