सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने, आपल्या मागण्यासंदर्भात, प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ, दि.05/06/2023 वार सोमवार रोजी, बोंब मारो आंदोलन.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

             

सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने, आपल्या मागण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ, दि.05/06/2023 वार सोमवार रोजी, बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे.गुंठेवारी बिगरशेती प्रकरणाबाबत गुंठेवारी बिनशेती मोजणीची जी जाचक अट घातलेली आहे त्याबाबत भुमी अभिलेख विभाग(मोजणीकार्यालय),तहसीलदार,तलाठी,महानगरपालिका नगररचना विभाग,इंजिनियर असोशियन,बिल्डर्स असोशियन,गुंठेवारी  कायद्या बाबत माहिती असलेले जाणकार लोक प्रतिनिधी यांची सयुंक्त मिटिंग घेण्यात यावी याबाबत मा. जिल्हाधिकारी सांगली यांना  दिनांक-३०/०१/२०२३ रोजी आमच्या प्रमुख मागण्याचे निवेदन मा.जिल्हाधिकारी  यांना  दिले होते याबाबत मा.जिल्हाधिकारी यांचे बरोबर झालेले चर्चे मध्ये त्यांनी संबंधित अधिकारी यांना मिटिंग आयोजित करणेबाबत सुचना केल्या होत्या पण त्यानंतर त्यांचे कडून कोणतीच मिटिंग आयोजित करण्यात आली नाही तरी त्याबाबत आम्ही मा. जिल्हाधिकारी यांना दिनांक-१७/०२/२०२३ रोजी याबाबत मिटिंग आयोजित करणेबाबत स्मरणपत्र दिले होते तरी गेल्या ४ महिन्यापासुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून अजुन  याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसुन येत नाही. तरी आमच्या प्रमुख मागण्या संदर्भात प्रशासनाकडुन ज्या पद्धतीने चालढकल होत आहे याच्या निषेधार्त दिनांक ५/६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. 

सर्व पक्षीय कृती समिती सांगली

मा.आ.नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार,हणमंतराव पवार,नगरसेवक संतोष पाटील,विष्णु माने,फिरोज पठाण,अभिजित भोसले,मंगेश चव्हाण,धिरज सुर्यवंशी,सतीश साखळकर,प्रशांत भोसले, विकास मगदूम,डॉ संजय  पाटील, कॉ उमेश देशमुख, कामरान सय्यद, तोहीद शेख, अविनाश जाधव, राजकुमार राठोड, संदीप दळवी,राजु नलवडे,रज्जाक नाईक,आनंद देसाई आदी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 

गेले कित्येक दिवस याबाबतीत जागृती मंचचे नेते सतीश साखळकर हे पाठपुरावा करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top